मुंबई : भारतात क्रिकेट खेळ सोडला तर इतर खेळांना ना फारशी लोकप्रियता आहे ना गांभीर्य... महिला खेळाडूंबाबत तर आपण अधिकच उदासिन आहोत. महिला फुटबॉल खेळाडूंची होणारी अशीच एक गैरसोय आम्ही समोर आणली आहे. महिला फुटबॉल खेळाडूंची ड्रेसिंग रुम. दक्षिण मुंबईतील कर्नाटक फुटबॉल असोसिएशनच्या मैदानावर असलेल्या या छोट्याशा आणि निकृष्ट खोलीत असणारी ड्रेसिंग रुमही काही दिवसांत कोसळली. यामुळे आता महिला फुटबॉल प्लेअर्सना कपडे बदलण्यासाठी जागाच उरलेली नाहीय. आता या महिला खेळाडूंना अपु-या शौचालयातच कपडे बदलावे लागतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका टीममध्ये एकूण अठरा खेळाडू असल्यानं एका मॅच दरम्यान दोन्ही टीम्स मिळून 36 महिला खेळाडूंना कपडे चेंज करण्यासाठी रांगेत उभं रहावं लागतं. यामुळं महिला खेळाडुंची चांगलीच कुचंबणा होते. कर्नाटक फुटबॉल असोसिएशननं ही ड्रेसिंग रुम दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र याला डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसनं आक्षेप घेत ही दुरुस्तीचं थांबवली. 


असोसिएशचा भाडेकरार संपुष्टात आल्याच कारणं देत आता डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स संघटना सहकार्य करण्यास नकार देत आहे. याप्रकरणी असोसिशननं मग कायदेशीरित्या दोनदा परवानगी मागितली. मात्र याबाबत डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स असोसिएशन उदासिनच वाटतंय. फुटबॉल संघटना आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसमधील या वादाचा नाहक त्रास मात्र महिला फुटबॉलपटूंना सोसावा लागतोय.