भारताच्या सेमी फायनलच्या आशा संपल्या
अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लडने भारताचा दोन गडी राखून पराभव केल्यामुळे भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
धर्मशाला : अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लडने भारताचा दोन गडी राखून पराभव केल्यामुळे भारताच्या महिला संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
भारताच्या महिला संघाने इंग्लडसमोर जिंकण्यासाठी केवळ ९१ धावांचे आव्हान दिले होते. या कमी धावांच्या सामन्यात इंग्लडने हे आव्हान ८ गडी आणि सहा चेंडू राखून पूर्ण केले.
भारताकडून एकताने ४ षटकात २१ धावा देऊन ४ विकेट घेतल्या तर हरमितप्रीतने २२ धावा देऊन दोन विकेट घेतल्या.
भारताची संधी पाकिस्तानमुळे गेली...
दिल्लीत डकवर्थ लुईस पद्धतीने पाकिस्ताने भारतावर विजय मिळविल्याने भारताच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी हुकली आहे. भारतीय महिलांनी आतापर्यंत तीन सामने खेळल आहेत. त्यातील दोन सामने भारताने गमावले आहे. बांगलादेश विरूद्ध त्यांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे आता भारताचे तीन सामने खेळून २ पॉइंट्स आहेत.
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड आघाडीवर
वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने दोन पैकी दोन सामने जिंकून आघाडी घेतली आहे. त्यांचे अजून दोन सामने आहेत. त्यामुळे त्यांचे प्रत्येकी चार गूण आहेत. दोघांना आता उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकला तरी त्यांचे सेमीफायनलचं तिकीट नक्की आहे.