अहमदाबादमध्ये होणार जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअममधून
गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) चे उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांनी सोमवारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमचे भूमिपूजन केले.
अहमदाबाद : गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) चे उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांनी सोमवारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमचे भूमिपूजन केले.
स्टेडिअमसाठी एकूण ७०० कोटी रूपये खर्च होणार आहे. हे स्टेडिअम येत्या दोन वर्षात पूर्ण करणार असल्याची घोषणा नाथवानी यांनी केली. जुन्या सरदार पटेल गुजरात स्टेडिअमच्या जागी स्थानावर बांधण्यात येणार आहे.
नाथवानी यांनी दावा केला की, काम पूर्ण झाल्यावर मोटेराचे हे स्टेडिअम जगातील सर्वात मोठे स्टेडिअम असणार आहे. यात एकूण १.१० लाख जण बसू शकणार आहेत. हे स्टेडिअम इतके मोठे असणार आहे त्याने ऑस्ट्रेलियातील ९० हजार लोक बसण्याची क्षमता आहे.
मेलबर्न क्रिकेटचे डिझाइन ज्या कंपनीने केले त्यांनाच याचे कॉन्ट्रॅक्ट दिला आहे.