कुस्तीपटू नरसिंग यादव डोपिंग टेस्टमध्ये दोषी
रिओ ऑलिंपिक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. मात्र त्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसलाय.
नवी दिल्ली : रिओ ऑलिंपिक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. मात्र त्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसलाय.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादव डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळलाय. नॅशनल अॅण्टी डोपिंग असोसिएशनने घेतलेल्या चाचणीत नरसिंग दोषी आढळलाय.
या आधी रिओ ऑलिंपिकमध्ये भारताकडून कोण जाणार यावरून नरसिंग यादव आणि सुशील कुमारमध्ये चांगलाचं वाद रंगला होता.
यावेळी न्यायालयीन लढाईत नरसिंगने बाजी मारल्याने त्याचा ऑलिंपिकचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र डोपिंग टेस्टमध्ये तो दोषी आढळल्याने त्याची रिओवारी धोक्यात आलीये.