मुंबई :  WWEतील माजी टॅग टीम चॅम्पियन न्यू डे के कोफी किंग्सटन आणि बिग ई गेल्या काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. यात त्याने अनेक प्रमोशनल अॅक्टीव्हिजी केल्या. त्यात मुंबईतील विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. यावेळी कोफी आणि बिग ई यांनी आयपीएलचा प्री शो एक्सट्रा इनिंग्ज टी २० मध्ये भाग घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही रेसलर क्रिकेटचे चाहते आहेत. एक्स्ट्रा इनिंग्जमध्ये दोन्ही पहेलवानांनी मुंबई इंडियन्सला चिअर केले. तसेच चिअरलीडरसोबत डान्सही केला. 


बिग ई आणि कोफी यांनी एक्स्ट्रा इनिंग नंतर गुजरात लायन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना पाहिला आणि मुंबई इंडियन्सला चिअर केले.