नवी दिल्ली : सध्या देशभरात जेनएनयू वादावरुन वातावरण चांगलच तापलयं. ऑलिंपिक कांस्यपदक विजेता आणि भारताचा स्टार कुस्तीपटू योगेश्वर दत्तने जेएनयूमध्ये भारताविरोधी घोषणाबाजी करणारे आणि अफजल गुरुला शहीद म्हणवणाऱ्यांना फेसबुकवरुन चांगलीच चपराक दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर अफजलला शहीद म्हणता तर हणमंतप्पा यांना काय म्हणायचे? असा थेट सवालच योगेश्वरने उपस्थित केलाय. योगेश्वर दत्तची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालीये. आतापर्यंत या पोस्टला ५८ हजार ९७० लाईक्स मिळालेत. तर आठ हजार ६५७ जणांनी शेअर केलीय. त्याने फेसबुकवर एक कविताही पोस्ट केलीये.