रिओ : भारताला आता रिओ ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याची एकमेव आशा कुस्तीपटू योगेश्वर दत्तच्या रुपात शिल्लक राहिलीय. योगेश्वरनं 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ मेडल पटकावून दिलं होतं. यामुळे या ऑलिम्पिकमध्येही योगेश्वर भारताला पुन्हा मेडलची कमाई करुन देईल अशी आशा भारतीय बाळगून आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं अखेरच्या टप्प्यात दोन मेडल्सची कमाई केली. आता भारताला अजून एका मेडलची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा योगेश्वर दत्त मेडल पटाकवून संपवेल अशी आशा वाटतेय. योगेश्वरनं लंडन 2012मध्ये भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिलं होतं. यामुळे यावेळेही योगेश्वर पुन्हा मेडल पटाकावेल अशी आशा देशावासिय बाळगून आहेत. दरम्यान गेल्या ऑलिम्पकमध्ये योगेश्वरनं 60 किलो वजनी फ्रीस्टाईल गटात मेडल पटकावलं होतं. यावेळी बदललेल्या नियमांमुळे त्याला 65 किलो फ्रीस्टाईल वजनी गटात खेळावं लागणार आहे. तर लंडन ऑलिम्पिकनंतर योगेश्वरला दुखापतींनी त्रस्त केल्यानं गेल्या तीन वर्षात त्याला फार स्पर्धा खेळता आलेल्या नाहीत. त्याच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानं त्याला बराचकाळ मॅटपासून दूर रहावं लागलं होतं. दुखापती आणि बदललेला वजनीगट या दोन्ही बाबींचं आव्हान योगेश्वरसमोर रियोमध्ये असेल. दरम्यान 'योगी' नावानं कुस्तीक्षेत्रात ओळखल्या जाणा-या योगेश्वरच्या ट्रॉफी केबिनमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप वगळता इतर सर्व मेडल्स आहेत.


योगेश्वरच्या ट्रॉफी केबिनमध्ये 2012 लंडन ऑलिम्पिक आणि 2012 एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप्सचं ब्राँझ मेडल आहे. याखेरीज 2006 एशियन गेम्समध्ये ब्राँझ आणि 2014 एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल आहे. 2010 आणि 2014 कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यानं गोल्ड मेडल पटकावलय. तर 2003, 2005 आणि 2007 कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये फ्रीस्टाईल प्रकारात गोल्ड आणि 2005, 2007 कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये ग्रिको रोमन प्रकारात सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय. 
 
33 वर्षीय योगेश्वरनं वयाच्या आठव्या वर्षी कुस्तीचे डाव शिकायला सुरुवात केली. आपल्याच गावातील पहैलवान बलराज यांच्याकडून प्रेरणा घेत योगेश्वर आखाड्यात उतरला आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यानं ऑलिम्पिकमध्ये एंट्री घेत मेडलही पटकावलं. योगेश्वरच्या करियरमधील हे चौथं ऑलिम्पिक आहे. नरसिंग यादववर बंदी घातल्यानंतर आता कुस्तीमध्ये सा-या आशा या योगेश्वर दत्तवर केंद्रीत झाल्या आहेत. आता योगेश्वर मेडल पटकावून भारताच्या मेडल टॅलीत अजून एक अंक वाढवतो का याकडेच सा-या देशाच लक्ष लागून राहिलं आहे.