सलमानच्या निवडीवर योगेश्वर दत्त नाराज
रिओ ऑलिंपिकसाठी सलमान खानला भारताचा गुडविल अॅम्बेसि़डेर बनवल्याबद्दल लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने नाराजी व्यक्त केलीये.
मुंबई : रिओ ऑलिंपिकसाठी सलमान खानला भारताचा गुडविल अॅम्बेसि़डेर बनवल्याबद्दल लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने नाराजी व्यक्त केलीये.
भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने सलमानची अॅम्बेसि़डेरपदी निवड केली. या यादीत शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश होता. त्यापैकी सलमानची निवड करण्यात आली.
दरम्यान, सलमानच्या निवडीवर योगेश्वरने ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केलीये. अॅम्बेसि़डेरचे काय काम असते. देशातील जनतेला का वेडे बनवताय असा सवाल त्याने ट्विटरवरुन केलाय.
तसेच पीटी उषा, मिल्खा सिंग सारख्या दिग्गज खेळाडूंनी कठीण काळात देशासाठी मेहनत केलीये. खेळाच्या क्षेत्रात या अॅम्बेसि़डेरने काय योगदान दिले असे योगेश्वर म्हणाला.