नवी दिल्ली : २००७मधील टी-२० वर्ल्डकप असो वा २०११ मधील वर्ल्डकप असो या दोन्ही वर्ल्डकपमध्ये चमकलेला हिरो म्हणजे युवराज सिंग. त्यांची दोन्ही वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र २०१४मधील टी-२० वर्ल्डकपदरम्यान हाच हिरो क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खलनायक ठरला. २०१४मध्ये टी-२० वर्ल्डकप भारताने गमावला त्याचा सारा दोष युवराजवर आला. मात्र आता हा डाग पुसण्याची संधी युवराजकडे आहे. 


सध्या युवराज चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या वर्ल्डकपमधील झालेल्या चुका टाळून तो यंदा पुन्हा एकदा मॅचविनर क्रिकेटर बनण्यास तो उत्सुक आहे. 


काय झाले होते २०१४च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये


हा असा वर्ल्डकप आहे जो युवराज कधीच विसरणार नाही. टीम इंडियाने चांगला खेळ करताना अंतिम फेरी गाठली होती. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात युवराजने २१ चेंडूत ११ धावा केल्या. यामुळे भारताला केवळ १३० धावा बनवता आल्या. श्रीलंकेने हे आव्हान सहज पूर्ण केले आणि वर्ल्डकप जिंकला. 


मात्र आता हा पराभव मागे सारून पुन्हा स्वत:ला मॅचविनर म्हणून सिद्ध करण्याची त्याची वेळ आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये युवीचा धमाका पाहायला मिळणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.