रणजीमध्ये युवराजनं फोडले फटाके
भारतीय टीममधून बाहेर असलेला ऑल राऊंडर युवराज सिंगनं रणजीमध्ये बडोद्याविरुद्धच्या मॅचमध्ये डबल सेंच्युरी मारली आहे.
नवी दिल्ली : भारतीय टीममधून बाहेर असलेला ऑल राऊंडर युवराज सिंगनं रणजीमध्ये बडोद्याविरुद्धच्या मॅचमध्ये डबल सेंच्युरी मारली आहे. युवराजनं 298 बॉलमध्ये नाबाद 260 रनची खेळी केली. युवराजच्या या इनिंगमध्ये 26 फोर आणि चार सिक्सचा समावेश आहे.
युवराजनं मनन व्होराबरोबर 343 रनची पार्टनरशीपही केली. पंजाबच्या या इनिंगमध्ये मनन व्होरानंही 224 रन केल्या. युवराज आणि मनन व्होराच्या या अफलातून इनिंगमुळे पंजाबला ही मॅच ड्रॉ करण्यात यश आलं.
पहिल्या इनिंगमध्ये बडोद्याची इनिंग 529 रनवर आटोपल्यानंतर पंजाबनं 670 रनचा डोंगर उभारला. यंदाच्या रणजी सिझनमध्ये युवराज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पंजाबकडून खेळताना यंदाच्या सिझनमध्ये युवीनं 83 च्या सरासरीनं तब्बल 587 रन केल्या आहेत. या चार मॅचमध्ये युवराजनं दोन सेंच्युरी, एक डबल सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी झळकावली आहे. युवराजच्या या फॉर्ममुळे त्यानं निवड समितीला पुन्हा एकदा त्याचा विचार करायला भाग पाडलं आहे.