बंगळुरु : टीम इंडियानं बंगळुरु वन-डेत पाहुण्या इंग्लिश टीमचा 75 रन्सनं धुव्वा उडवला. या विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं टेस्ट, वन-डे आणि टी-20 सीरिजही जिंकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून युवा यजुवेंद्र चाहलनं सहा विकेट्स घेतल्या. त्याच्या भेदक मा-यामुळेच टीम इंडियाला हा विजय साकारता आला. या शानदार कामागिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने गौरवण्यात आले.


सुरैश रैनाच्या 63 रन्सच्या आणि धोनीच्या 56 रन्सच्या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडसमोर 203 रन्सचं आव्हान ठेवलं होते. हे आवाहान पार करताना इंग्लंडची सुरुवातही धडाकेबाज झाली होती. जो रुट आणि कॅप्टन इयॉन मॉर्गननं थोडाफार प्रतिकार केला. मात्र, चाहलच्या बॉलिंगसमोर इंग्लिश बॅट्समनचं काहीच चालले नाही.


पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिसऱ्याही सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकला. इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात विराट कोहली केवळ 2 धावांवर रनआऊट झाला. मात्र, त्यानंतर मैदानावर आलेल्या सुरेश रैनाने के. एल राहुलच्या साथीने इंग्लंडवर हल्लाबोल केला आणि रन्सची गती कमी होऊ दिली नाही. भारताकडून रैना (63), धोनी (56) आणि युवराजने (27) तुफान फटकेबाजी केली. या जोरावर भारताने इंग्लंडला 203 रन्सचे आव्हान दिले होते.