नवी दिल्ली : जगप्रसिध्द सोशल मिडिया 'फेसबुक' साध्या खोट्या बातम्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिवसेंदिवस फेसबुकवर दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्या, जाहिराती आणि माहिती पसरवण्याचे प्रमाण वाढत आहे.
अनेकदा फेसबुकवरील खोट्या माहितीमुळे लोकांपर्यंत खरी माहिती पोहचत नाही. तसेच फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, लोकांना योग्य माहिती पोहचवणे आमचा उद्देश आहे, परंतु फेसबुकवरून सध्या पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. यावर निर्बंध आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आगामी काळात खोट्या माहितीवर आळा बसवण्यासाठी फेसबुक नवीन कल्पना आणणार आहे.


स्ट्रॅागर डिटेक्शन: याच्या सहाय्याने चुकीचा कंटेट साईटवरुन हटवला जाणार आहे.


ईझी रिपोर्टिंग: लोकांना खोट्या माहितीविषयी तातडीने तक्रार करण्यासाठी   सुविधा पुरवण्यात येणार.


थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन: ज्या संस्थांच्या माध्यमातून खऱ्या गोष्टी तपासल्या त्याच्याशी संपर्क करून खोट्या बातम्यांना हटवण्यात येणार आहे.


वॅार्निंग: फेसबुकवर येणाऱ्या खोट्या बातम्यांवर लेबल लावले जाणार जेणेकरून लोकांना समजेल की, एखाद्या बातमीला किती लोकांनी खोट ठरवल आहे.


रिलेटेड आर्टिकल्स क्वॅालिटी: साईटवर असणाऱ्या बातम्यांच्या क्वॉलिटीवरही लक्ष दिले जाणार आहे.


खोट्या बातम्या: पैशासंदर्भातील खोट्या बातम्यांना काढून टाकले जाणार तसेच त्यासंदर्भातील जाहिरातींची देखील चौकशी  होणार आहे.


माध्यमांशी संपर्क: फेसबुक पत्रकार आणि न्यूज कंपन्यांसोबत राहून बातम्यांची सत्यता पडताळली जाणार आहे.