मुंबई: हार्बर लाईनवरुन प्रवास करणाऱ्यांना रेल्वे प्रशासन लवकरच दिलासा देणार आहे. हार्बर लाईनवर जून महिन्यापासून 12 डब्यांची लोकल धावणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकल 12 डब्यांची करण्यासाठी आवश्यक असलेली प्लॅटफॉर्मची कामंही याच महिन्यामध्ये पू्र्ण करण्यात येणार आहेत. या कामासाठी सीएसटी स्टेशनवरचं प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम आणि रुळांचं काम 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.


हे काम पूर्ण झाल्यानंतर 12 ते 14 फेब्रुवारीपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन प्लॅटफॉर्म विस्तारिकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात सीएसटी ते वडाळा दरम्यानची लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच हार्बरवरच डीसी टू एसी कनवर्जन मार्च महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.