नोटबंदीनंतर मोदी सरकारचा बजेटमध्ये सर्वात मोठा निर्णय
नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये पुन्हा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. आता यापुढे ३ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार चेक, ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.
नवी दिल्ली : नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये पुन्हा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. आता यापुढे ३ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार चेक, ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.
३ लाखांपेक्षा अधिक रोखीने व्यवहार नाही
मोदी सरकाराने काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी आता ३ लाखापेक्षा अधिकचे व्यवहार रोखीने करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता कोणताही ३ लाखांपेक्षा अधिकचा व्यवहार हा चेक किंवा ऑनलाइन करावा लागणार आहे. या माध्यमातून आता बँका ३ लाखापेक्षा अधिक रक्कम कॅशच्या माध्यमातून देणार नाही असे स्पष्ट झाले आहे.
रोखीच्या व्यवहारांमुळे काळ्या पैशांची निर्मिती होते. ते रोखण्यासाठी मोदींनी हे पाऊल उचलले आहे. रोखीने व्यवहार करण्याची ही ट्रान्सॅक्शन लिमिट बदलण्यासाठी आयकर कायद्यात बदल करणार असल्याचेही जेटली यांनी सांगितले.