नवी दिल्ली :  अनेक वाद आणि सस्पेंसनंतर आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ साठीचे  सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मोदी सरकारचे हे बजेट शेर-ओ-शायरीचे बजेट आहे, मग यात इतर काहीच नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेत बजेट सादर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, हे शेर-ओ-शायरीचे बजेट आहे. शेतकरी, युवा रोजगारासाठी काहीच नाही. भाषण देण्यात आले पण ठोस असे काहीच देण्यात आले नाही. राजकीय पक्षांच्या फंडिंगबाबत उचलण्यात आलेले पाऊल चांगले आहे. याची आम्ही प्रशंसा करतो. 


यानंतर राहुल गांधी म्हणाले की, भारत सध्या रोजगारच्या समस्येने पीडित आहे. पण बजेटमध्य त्याचं कोणतेही व्हिजन दिसले नाही. किंवा आयडीया नाही. शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये काहीच नाही. आम्हांला काही मोठ्यांची अपेक्षा होती पण असं काहीच झालं नाही.