लोकल ट्रेनमध्ये केला गुढीपाडवा साजरा
मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजे त्यांची लाईफलाईन. दिवसातले बरेचसे तास ते या ट्रेनमध्येच असतात. तिकडेच त्यांना रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जीव लावणारे भेटतात.
मुंबई : मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजे त्यांची लाईफलाईन. दिवसातले बरेचसे तास ते या ट्रेनमध्येच असतात. तिकडेच त्यांना रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जीव लावणारे भेटतात.
दिवाळीपासून ख्रिसमसपर्यंत तर ईदपासून ओणमपर्यंत सगळे सण ते एकत्र साजरे करतात, मग तिकडे कोणत्याही जाती-धर्माच्या मर्यादा येत नाहीत.
असंच वसईच्या ८:१८च्या चर्चगेट लोकलमध्ये काल गुढीपाडवा साजरा करण्यात आला. त्या महिलांनी खरंच एक लहानसा गुढी उभारला होता.
सर्वजणी छान नटून, केसात गजरे माळून आल्या होत्या. त्यांच्यापैकी सर्वच काही हिंदू नव्हत्या. मात्र त्यांनी आपल्या मैत्रिणींसोबत हा नववर्षाचा सण साजरा केला.
आपापले स्टेशन येऊन उतरायच्या आधी त्यांनी तिथल्या तिथे छोटेखानी खाऊपार्टीही केली. पाहा त्याची ही झलक.