वॉशिंग्टन : खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. महिलांना नोकरीवर ठेवताना विविध गोष्टी विचारात घेतल्या जातात.  नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतांना महिलांना वैयक्तीक माहिती देऊ नये असे सांगतात पण याबाबत आता एक नवी गोष्ट समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांनी मुलाखतीमध्ये जर त्यांची वैयक्तीक माहिती दिली तर नोकरी मिळण्याची शक्यता वाढते असं एका सर्वेमधून समोर आलंय. कोटुंबिक कारणामुळे नोकरीमध्ये गॅप पडतो. पण याची माहिती जर बायो़डेटामध्ये व्यवस्थित दिली असेल तर महिलांना नोकरी मिळण्याची संधी मिळते असं या अभ्यासातून समोर आलंय.


ज्या महिलांनी त्यांची व्यक्तीगत माहिती लपवण्याचा प्रयत्न केला त्यांना नोकरीची संधी मिळत नाही. अमेरिकेतील व्हँडरबील्ट विद्यापीठातील एका  प्राध्यापकाने या अभ्यासातून ही गोष्ट मांडली आहे.