दहावीतल्या रमेशला गुगलची 34 लाख रुपयांची स्कॉलरशीप
समुद्रामध्ये मासेमारी करताना चुकून दुसऱ्या देशात गेलेल्या मच्छिमारांबाबतच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो.
चेन्नई : समुद्रामध्ये मासेमारी करताना चुकून दुसऱ्या देशात गेलेल्या मच्छिमारांबाबतच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. या मच्छिमारांना दुसऱ्या देशांमध्ये अटक केली जाते, आणि त्यांच्यावर अत्याचार केले जातात.
या मच्छिमारांना सागरी सीमांचा अंदाज यावा यासाठी रमेश अद्वय या भारतीय मुलानं अनोखा उपाय शोधला आहे. सागरी सीमांचा अंदाज यावा यासाठी रमेशनं अॅप्लिकेशनचं तयार केलं आहे. FLET म्हणजेच FishErmen Lifeline Terminal असं या अॅप्लिकेशनचं नाव आहे. नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिमशिवायही हे अॅप्लिकेशन काम करू शकणार आहे.
हे अॅप्लिकेशन तयार केलेला रमेश चेन्नईच्या नॅशनल पब्लिक स्कूलमध्ये दहावीत शिकत आहे. रमेशच्या या कामगिरीला गुगलनंही सलाम केला आहे. गुगल कम्युनिटी इम्पॅक्टनं रमेशचा गौरव केला आहे. गुगलनं रमेशला 50 हजार डॉलर म्हणजेच 33.57 लाख रुपयांच्या स्कॉलरशीपसाठीच्या अंतिम 20 डेव्हलपर्सच्या यादीत समाविष्ट केलं आहे.