मुंबई : रिलायंस जिओच्या ग्राहकांना मिळणारी फ्री सर्विस आता संपली आहे. जर जिओ यूजरला सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर तर त्यांना रिचार्ज करावा लागेल. जिओ प्राईम प्रीपेड यूजर्ससाठी कंपनीच्या वेबसाइट Jio.com वर प्लान दिले गेले आहेत. याआधी कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर 19 रुपयांपासून ते 9,999 रुपयांपर्यंतचे प्लान दिले होते पण आता ते सर्व हटवण्यात आले आहेत आणि फक्त तीन प्लान देण्यात आले आहेत. ज्यामध्ये २ धन धना धन ऑफर वाले प्लान आहेत. सध्या पोस्टपेड यूजर्ससाठी कोणताही प्लान नाही दिला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला प्लान 149 रुपयांचा आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी वॉईस कॉलिंग, 2 जीबी 4जी डेटा, 300 लोकल आणि एसटीडी एसएमएस देण्यात आले आहेत. यामध्ये जियो अॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन देखील आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची असणार आहे.


दुसरा प्लान 309 रुपयांचा आहे. यामध्ये दोन कॅटेगरी आहेत. पहिली कॅटेगरी First recharge आणि दूसरी Subsequent Recharge आहे. First recharge कॅटेगरीमध्ये धन धना धन ऑफरचा लाभ घेता येईल. यामध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी वॉईस कॉल, एसएमएस आणि डेटा दिला जाईल. यूजर 1 दिवसात 1 जीबी डेटा 4जी स्पीडवर वापरु शकतो. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे.


Subsequent Recharge कॅटेगरीमध्ये यूजरला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी वॉईस कॉल, अनलिमिटेड डेटा दिला जाईल. यामध्ये ही यूजरला १ दिवसात १ जीबी डेटा 4जी स्पीडवर वापरता येणार आहे. पण याची वैधता २८ दिवसांची असेल.


First recharge कॅटेगरीमध्ये यूजरला 84 जीबी 4जी डेटा आणि Subsequent Recharge कॅटेगरीमध्ये 28 जीबी 4जी डेटा मिळेल.


तिसरा प्लान 509 रुपयांचा आहे. यामध्ये ही First recharge आणि Subsequent Recharge कॅटेगरी देण्यात आली आहे. First recharge मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि डेटा (2 जीबी डेटा प्रतिदिवस, 4जी स्पीड) दिला जाईल. वैधता 84  दिवसांची असेल. तर Subsequent Recharge मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि डेटा (2 जीबी, प्रतिदिवस 4जी स्पीड) वर दिली जाईल. याची वैधता 28 दिवसांची असेल. First recharge यूजर्सला 168 जीबी 4जी डेटा आणि Subsequent Recharge मध्ये 56 जीबी 4जी डेटा दिला जाईल.