हे 5 नियम पाळा आणि नोकरी मिळवा
कोणतीही कंपनी तुम्हाला नोकरीवर घेताना तुमच्यातल्या टॅलेंटबरोबरच तुमच्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी बघतात.
मुंबई: कोणतीही कंपनी तुम्हाला नोकरीवर घेताना तुमच्यातल्या टॅलेंटबरोबरच तुमच्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी बघतात. यंदाच्या वर्षीही भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर हे पाच नियम पाळा आणि यशस्वी व्हा.
तुमचं वेगळेपण ओळखा
नोकरी शोधताना तुमच्याबरोबरच इतर अनेक इच्छुक उमेदवार असतील. त्यांचा अनुभव, शिक्षण हा तुमच्या एवढच असू शकतं. त्यामुळे तुमच्यामधलं वेगळेपण ओळखा, ज्यामुळे कंपनी इतरांपेक्षा तुम्हालाच पसंती दिली जाईल.
योग्य जागेसाठी अर्ज करा
समोर दिसत असलेल्या अनेक संधी बघून तुम्ही तिथे अर्ज करायचा विचार कराल, पण अशा मोहामध्ये कधीच पडू नका. तुम्हाला कोणत्या जागेवर काम करायचं आहे आणि हे काम तुम्हाला समाधान देणारं असेल तरच तिथे अर्ज करा.
आव्हानं स्वीकाऱ्याची तयारी ठेवा
कोणतीही कंपनी आव्हानं स्वीकारणाऱ्या व्यक्तीलाच कामावर घेणं पसंत करते. त्यामुळे आव्हानं स्वीकारायची तयारी ठेवा.
सोशल नेटवर्किंगवरचा वापर करत राहा
नोकरीवर घ्यायचे जुने फंडे आता कमी होऊ लागले आहेत. तुम्हाला नोकरीवर घेण्याआधी कंपनीकडून तुमचं सोशल नेटवर्किंग अकाऊंट चेक होण्याची शक्यता आहे. तुम्ही सोशल नेटवर्किंग वर टाकलेले फोटो, तुम्ही टाकलेली तुमची स्टेटस आणि पोस्ट हे कंपनीकडून पाहिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल नेटवर्किंगचा वापर करत राहा.
तुमचा रिझ्युम स्पष्ट ठेवा
इंटरव्ह्यू हॉलमध्ये जाण्यासाठीच फक्त रिझ्युमचा उपयोग असतो असा अनेकांचा गैरसमज असू शकतो, पण तुमचा रिझ्युम स्पष्ट ठेवा. ऑनलाईन रिझ्युम अपडेट करताना तर विशेष काळजी घ्या. रिझ्युम तयार करताना स्पेलिंग मिस्टेक टाळा, आणि कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करा.