प्रमोशन मिळवण्यासाठी करा हे 5 उपाय
अगदी शाळेपासून ते आफिसपर्यंत आपण कसे इतरांपेक्षा सरस आहे हे दाखवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळवून तर ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवून. पण अनेकदा प्रमोशन मिळवणं ऐवढं सोपं नसतं. फक्त बॉसच्या पुढे-पुढे केल्यास किंवा चमचेगिरी केल्यावरच प्रमोशन होतं असं अनेकांचं म्हणणं असतं पण असं अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं.
मुंबई : अगदी शाळेपासून ते आफिसपर्यंत आपण कसे इतरांपेक्षा सरस आहे हे दाखवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळवून तर ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवून. पण अनेकदा प्रमोशन मिळवणं ऐवढं सोपं नसतं. फक्त बॉसच्या पुढे-पुढे केल्यास किंवा चमचेगिरी केल्यावरच प्रमोशन होतं असं अनेकांचं म्हणणं असतं पण असं अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं.
प्रमोशन मिळवण्यासाठी 5 उपाय
1. टार्गेट ठरवा : जर तुम्ही टार्गेट ठरवून काम कराल तर निश्चितच तुमचं काम चांगलं होईल. चांगली मेहनत आणि समर्पणने काम करा. असं केल्यास तुमच्या प्रमोशनच्या शक्यता वाढतात.
2. चांगला मित्र बनवा : एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जेथेही काम करता तेथे चांगले मित्र बनवा ज्यांच्याकडे अनुभव असेल. कोणतीही गोष्ट माहित नसेल तर ती विचारण्यात संकोच बाळगू नका. प्रमोशनसाठी कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात त्या गोष्टी जाणून घ्या आणि त्या दिशेने काम करायला सुरुवात करा.
3. नव्या गोष्टी शिका : तुम्ही कितीही काम करत असलात तरी वेळेनुसार नवीन नवीन गोष्टी शिकणं देखील महत्त्वाचं आहे. नेमही अशा गोष्टी शिका ज्यामुळे तुमच्या कंपनीचा ही फायदा होईल आणि तुम्हालाही त्याचा फायदा तर निश्चित होईल.
4. बसण्याची जागा : जेव्हा तुम्हाला बसण्यासाठी जागा दिली जाते तर लक्षात ठेवा की ती खांब्याच्या बाजूला नको. खांब असल्यास त्यामुळे सकारात्मक ऊर्जा रोखली जाते. सीटवर बसल्यानंतर तुमची पाठ ही मुख्य प्रवेशद्वाराकडे नसावी.
5. डेस्क चांगला ठेवा : तुम्ही जेथे बसता तो तुमचा डेस्क नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. तुम्ही जेथे बसता ती जागा तुम्ही पेंटींग किंवा इतर गोष्टींनी सजवा. यामुळे तुमच्याकडे बघण्याचा लोकांना दृष्टीकोन नक्कीच बदलतो.