मुंबई : लग्न म्हणजे दोन जीवांचे पवित्र बंधन असे मानले जाते. मात्र आजची पिढी लग्नासाठी घाबरतेय. त्याला कारणेही तशीच आहेत. हल्लीची मुले मला लग्नच करायचेय नाही, लग्न करुन उगाच बंधनात का अडका असा विचार करु लागलीयेत. यामागे त्यांची बरीच कारणे आहे. 


ही आहेत ८ कारणे ज्यामुळे आजची तरुणाई लग्नासाठी घाबरतेय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. स्वातंत्र्य गमावणे - लग्न म्हणजे एक प्रकारचे बंधन असते. त्यामुळे या बंधनात अडकण्यासाठी आजची तरुण पिढी तयार नाहीये. त्यांना स्वतंत्रपणे जगायचय.


२. अॅडजस्टमेंट नकोय - लग्नानंतर अॅडजस्टमेंट ही करावीच लागते अशी वाक्ये आपल्याला मोठ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. हीच अॅडजस्टमेंट करावी लागू नये म्हणून हल्लीची तरुण पिढी लग्नास नको म्हणते. 


३. करिअर महत्त्वाचे - लग्नानंतर आपल्या करिअरला सासरच्यांकडचे प्राधान्य देतील का? का लग्नानंतर करिअर सोडावे लागेल हे प्रश्न अधिक महत्त्वाचे ठरु लागलेत.


४. जग फिरायचय - तु का लग्न करत नाहीस? या प्रश्नावर उत्तर देताना अनेक तरुण-तरुणी सांगतात ओह प्लीज मला अजून जग फिरायचेय. त्यानंतर लग्नाचे काय ते बघेन. लग्नापेक्षा जग फिरणे ही महत्त्वाची गोष्ट झालीये. 


५. आयुष्यातील मजा कायम राहावी - सिंगल असताना आपण मित्र-मैत्रिणींसोबत खूप मजा करतो. हीच मजा कायम करता यावी म्हणून अनेकजण म्हणतात लग्न नको रे बाबा.


६. खूप साऱ्या अपेक्षा - लग्नासाठीच्या जाहिरातीत मुला-मुलींच्या अपेक्षा लिहिलेल्या असतात. माझी होणारी बायको गोरी असायला हवी अथवा मुलींच्या अपेक्षा असतात नवरा उच्चशिक्षित आणि चांगला पगार घेणार हवा. याच अपेक्षांच्या भडिमारामुळे लग्नाबाबत हल्लीची तरुण पिढी नकारात्मक विचार करते.


७. स्वत:ला सिद्ध करायचेय - आयुष्यात खूप काही कमवायचे आहे. स्वत:ला सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लग्न बंधनात अडकायला नको असा विचार हल्लीची तरुण पिढी करते.


८. विश्वास महत्त्वाचा- नाते टिकवण्यासाठी विश्वास महत्त्वाचा. मात्र हल्ली नात्यामध्ये विश्वास टिकताना दिसत नाही.