मुंबई : तुम्ही जर नवीन मोबाईल विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन ऑप्शन मार्केटमध्ये उपलब्ध झालाय. 'मायक्रोमॅक्स टेलीवेंचर' कंपनीनं नुकताच ६ इंचाचा 'युरेका नोट' हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरेकाचं हे पहिल प्रोडक्ट आहे जे सर्व मोबाईल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. याआधी या कंपनीनं आपल्या सर्व स्मार्टफोनची विक्री ही फक्त ऑनलाइनच केलीय.


'युरेका नोट'चे फिचर्स...  
स्क्रीन : युरेका नोट ६ इंच फूल एचडी, तसेच १९२० X १०८० पिक्सल डिसप्ले
स्क्रीन प्रोटेक्शन :  ३ कोटींग असलेली गोरीला ग्लास,
ऑपरेटिंग सिस्टम : अँन्ड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉप
कनेक्टिव्हिटी : ४जी, एलटीई, वाईफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि मायक्रो-यूएसबी
बॅटरी : ४००० एमएएच, क्वीक चार्जिंगचा ऑप्शन
प्रोसेसर :  १.५ गीगाहर्टस ऑक्टा-कोर मीडियाटेक एमटी ६७५३ प्रोससर
रॅम : ३ जीबी
इंटरनल स्टोरेज : १६ जीबी,  मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट
कॅमेरा : एलईडी फ्लॅश बरोबर १३ मेगपिक्सल रिअर कॅमेरा आणि
फ्रंट कॅमेरा : एफ/२.२ अपर्चरसोबत  ५ मेगपिक्सल फ्रंट कॅमेरा
मोबाईल बॉडी : मेटलफ्रेमसोबत पॉली कार्बोनेट बॉडी


फिंगरप्रिट सेंसरद्वारे हा फोन अर्ध्या सेकंद पेक्षा कमी वेळेत अनलॉक करु शकतो, असं कंपनीचं म्हणणं आहे.... आणि मुख्य म्हणजे या स्मार्टफोनची किंमत आहे केवळ १३,४९९ रुपये...