नवी दिल्ली :  रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये सर्वात पुढे चालणारी कंपनी एअरटेलने पुन्हा एक धमाका केला आहे. एअरटेलने तीन महिन्यांच्या अनलिमिटेड इंटरनेटच्या ऑफरनंतर आता १४८ रुपयात अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलने या ऑफरमध्ये १४८ रुपयांत अनलिमिटेड लोकल एअरटेल मोबाईल कॉल्स मोफत दिले आहे. या पॅकची वैधता एक महिन्यांची राहणार आहे. 


काय करावे लागले यासाठी...


- यासाठी सर्वात प्रथम एअरटेल प्रीपेड ग्राहकाला आपल्या मोबाईलवर *121*1# डायल करावे लागणार आहे. 
- त्यानंतर तुमच्याकडे एक मेसेज येईल, त्यात काही डिटेल्स लिहिल्या असतील. 
-या ठिकाणी तुम्हांला १ आकडा दाबून कंफर्मेशन द्यावे लागणार आहे. 
-त्यानंतर पुन्हा तुम्हांला एक मेसेज येईल. त्यात काही पर्याय असतील 
- येथेही १ लिहून मेसेज पाठवावा लागणार आहे. 
- यानंतर तुमच्या खात्यातून १४८ रुपये कट होतील. 
-यानंतर एक महिन्यासाठी तुमचे एक महिन्यासाठी एअरटेल ते एअरटेल मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध होईल. 


सूचना...


ही सुविधा तुमच्याकडे अॅक्टीवेट करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये १४८ रुपयांचा बॅलेन्स असणे गरजेचे आहे. बॅलेन्स कमी असल्यावर तुम्हांला ही सेवा अॅक्टीवेट करता येणार नाही.