मुंबई : रिलायन्स जिओने मोफत सेवा सुरु केल्यानंतर डेटा प्राइस वॉर सुरु झालेय. आता एअरटेलने आणखी एक ऑफर आणली आहे. एअरटेलच्या ऑफरनुसार ग्राहकांने 249 रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. यामध्ये 10 जीबीचा 4 जी डेटा मिळेल. म्हणजेच तू 25 रुपयांत 1 जीबी इंटरनेट डेटा मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी एअरटेलने गुजरातमध्ये 4 जी सेवा सुरु केली. 4जीच्या सुरुवातील कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांना एक खास ऑफर सुरु केली आहे. या ऑफरनुसार तुम्ही नवीन 4 जी फोन खरीदी करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ उठवू शकता.


या ऑफरचा लाब घेण्यासाठी आपल्याला 249 रुपयांचा रिचार्ज करावे लागेल. रिचार्ज करताना आपल्या खात्यात 1 जीबी 4जी डाटा जमा होईल. नंतर बाकीचा 9 जीबी इंटरनेट डेटा मिळविण्यासाठी तुम्हाला डेटा क्लेम करावा लागेल. त्यासाठी आपल्याला 52141 वर इंग्रजी SMS 4 G असे लिहून मॅसेज करावा लागेल.