मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सगळ्याच कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत. या वेगवेगळ्या ऑफर्समध्ये आता एअरटेलच्या आणखी एका ऑफरची भर पडली आहे. एअरटेल सरप्राईज ऑफर असं या ऑफरचं नाव असून ग्राहकांना ३० जीबी ४जी डेटा फुकटात देण्यात येणार आहे.


एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी ही ऑफर असणार आहे. एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांना माय एअरटेल अॅपमधून हा डेटा मिळवता येणार आहे. एअरटेलची ही ऑफर तीन महिन्यांसाठी असून प्रत्येक महिन्याला ग्राहकांना १० जीबी डेटा मिळणार आहे.