मुंबई : सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांची झोप कमी झाल्याचे एका संशोधनातून समोर आलेय. प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आरोग्यासाठी सहा ते ८ तासांची झोप आवश्यक असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र व्हॉटसअॅप आणि फेसबुकमुळे लोकांच्या झोपेचे प्रमाण दीड तासांनी कमी झालेय. बंगळुरुतल्या नॅशनल इंस्टिटयूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्सनं याबाबतचा एक रिपोर्ट नुकताच जाहीर केला. 


या रिपोर्टनुसार व्हॉटसअॅप आणि फेसबुकच्या वापरामुळे लोकांची झोप दीड तासांनी कमी झालीये. चॅटिंगच्या सवयीमुळे झोपेचे तास कमी झालेत. 
रात्री अनेक जण मॅसेज चेक करण्यासाठी जागे राहतात. झोपण्यासाठी गेल्यानंतरही अनेकजण किमान चार वेळा तरी कोणाचे मेसेज आलेत ते पाहण्यासाठी मोबाईल चेक करतात. 


यासाठी झोपेच्यावेळी मोबाईल बंद ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. झोप कमी झाली किंवा झोपेचा आजार झाला तर ह्दयरोग होऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले आहे.