मुंबई : आता प्रत्येक बँक खातेदारकडे एटीएम आहे. खासगी आणि सार्वजनिक बँकांनी सरसकट प्रत्येक ग्राहकाला एटीएम दिली आहे. त्यामुळे या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे भारताची सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने एक जाहिरात दिली आहे. त्यात एटीएमकार्ड धारकांसाठी एक जाहिरात दिली आहे. 


ही जाहिरात  खूप महत्त्वाची आहे आणि प्रत्येकांने ही वाचलीच पाहिजे...


महत्त्वाच्या आठ स्टेप- 


१) फसव्या कॉलपासून सावध रहा. कोणतीही माहिती देऊ नका. 


२) तुमचा पिन नियमित बदला .


३) तुमचा पिन लक्षात ठेवा. तो कार्डासोबत ठेवू नका किंवा इतर कुठेही लिहू नका. 


४) तुमचे एटीएम कार्ड, पिन आणि इंटरनेट बँकिंगसंबंधीत तपशिल इतर कोणालाही देऊ नका. 


५) एटीएममध्ये इतर कोणालाही आपल्याजवळ येऊ देऊ नका आणि एटीएम व्यवहारासाठी कोणाचीही मदत घेऊ नका. 


६) एटीएम मशिनला कोणतेही अज्ञात उपकरण किंवा संशयासप्द मशिन लावले असल्यास तुमचे कार्ड स्वाइप करू नका. 


७) तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करण्यासाठी तुमच्या शाखेला भेट द्या आणि व्यवहारासंबंध एसएमएस अॅलर्टस मिळवा. 


८) कार्ड हरवल्यास ते ताबडतोब ब्लॉक करा.