मुंबई :  तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का, एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी कार्ड टाकले, पण पैसैच आले नाही आणि तुमच्या खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज मात्र आला, मग अशा वेळेस काय कराल.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे लाखातून एका व्यक्तीसोबत होते. पण असे भविष्यात तुमच्यासोबत झाले तर पुढील स्टेप फॉलो करा... ( या रिझर्व बँकेच्या गाइडलाइन्स आहेत....)


१) ज्या ग्राहकासोबत असा प्रकार घडला आहे, त्याने त्वरित आपल्या बँकेकडे तक्रार दाखल करावी.  हा प्रकार तुमच्या बँकेच्या एटीएममधून झाला असेल किंवा इतर एटीएममधून झाले असेल तरी वरील प्रोसिजर करावी लागते. 


२) असा प्रकार घडला तर तक्रार दाखल करण्यासाठी त्या एटीएममध्ये संपर्क क्रमांक किंवा टोल फ्री नंबर लिहिलेला असतो. घाबरून जाऊन नका. 


३) रिझर्व बँकेच्या आदेशानुसार  ग्राहकांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँकांनी त्यांच्या खात्यात कामाच्या सात दिवसात पैसे क्रेडिट करणे अनिवार्य आहे. हे तक्रार दाखल केल्याच्या सात दिवसात पैसे जमा होणे गरजेचे आहे. 


४) १ जुलै २०११ पासून बँकांनी पैसे सात दिवसात क्रेडिट केले नाही तर प्रत्येक दिवसाला १०० रुपये असे तक्रारदार ग्राहकाच्या खात्यात जमा करावे लागतात. 


५) ग्राहकाला मिळणारी नुकसानभरपाई ही बँकेने ३० दिवसाच्या आत त्याच्या खात्यात जमा केली पाहिजे. त्याने क्लेम केली असे तरी नसेल तरी.  पण घडलेल्या प्रकाराची तक्रार जर ग्राहकांने आपल्या बँकेत ३० दिवसांच्या आत केली नाही तर त्याला ७ दिवसानंतर प्रत्येक दिवशी मिळणारी नुकसान भरपाई मिळणार नाही. 


६) दरम्यान, ज्या बँकेचे कार्ड आहे त्या बँककडून ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण झालं नाही तर तो आपली तक्रार बँकिंग लोकायुक्ताकडे देऊ शकतो. 


७) प्रत्येक बँकेच्या एटीएम सेंटर येथे सीसीटीव्ही असते. त्या फुटेजच्या आधारे आपण सिद्ध करू शकतो की एटीएममधून पैसे आले की नाही.