नवी दिल्ली: ऑटो एक्स्पो 2016मध्ये आतापर्यंतची सगळ्यात सुरक्षित गाडी लॉन्च करण्यात आली आहे. ऑडीनं आपलं ए 8 एल सिक्युरिटी हे मॉडेल लॉन्च केलं आहे. कंपनीनं या मॉडेलबाबत दावा केला आहे की या गाडीवर एके-47 च्या गोळ्या झाडल्या तरी काहीही परिणाम होत नाही. ऑडीच्या या सगळ्यात सुरक्षित गाडीची किंमत आहे 9.15 कोटी रुपये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑर्डर दिल्यावरच बनणार गाडी 
ही गाडी ऑर्डर आल्यावरच कंपनी बनवणार आहे. अशा प्रकारची एक गाडी बनवण्यासाठी 6 ते 9 महिन्यांचा वेळ लागतो.


ऑडी ए8 एल सिक्युरीटीमध्ये आहेत या पाच गोष्टी


1 या गाडीवर केमिकल ऍटेक झाला तर गाडीच्या चारही बाजूंनी आपोआप एक कवच तयार होईल, आणि कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला 10 मिनीटांपर्यंत ऑक्सिजन मिळेल. 


2 कोणत्याही अपघात किंवा घातपातामध्ये गाडीचा टायर जर पंक्चर झाला तरीही ही गाडी ताशी 80 किमी वेगानं जाऊ शकते. 


3 या गाडीवर जरी चारही बाजूंनी हल्ला झाला तरीही गाडीच्या आत असलेल्या माणसाला कोणताच धोका नाही, कारण या गाडीचा दरवाजा प्रत्येकाला उघडता येणार नाही, कारण गाडीचा दरवाजाच 160 किलोचा आहे. 


4 बहुतेक गाड्यांमध्ये एक बॅटरी असते, पण ऑडीच्या या गाडीमध्ये तब्बल 5 बॅटरी लावण्यात आल्या आहेत. 


5 ही गाडी 9 किमी प्रती लीटर इतक मायलेज देते, तर ताशी 210 किमीच्या वेगानं ही गाडी पळते.