नवी दिल्ली : सध्या एका मांजरीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध होतोय. बॅगल असं या मांजरीचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅगल सोशल मीडियावर सनग्लास कॅट नावाने प्रसिद्ध झालीये. बॅगलची मालकीण कॅरेन मॅकगिल कॅलिफोर्निया येथे राहते. दोन महिन्यांची असताना बॅगलला तिने घरी आणले होते. तिला लहानपणापासूनच डोळ्यांचा आजार आहे. तिच्या डोळ्यात अश्रू निर्माण होत नाहीत. 


या आजारामुळे तिच्यावर आतापर्यंत तीन ऑपरेशन करण्यात आलेत. तसेच तिच्या डोळ्यात दररोज औषध टाकावे लागते. तिच्या डोळ्यांच्या संरक्षणासाठी कॅरेन तिला बाहेर नेताना सनग्लासेस लावते. जेव्हा कधी कॅरेन तिच्या मांजराला घेऊन बाहेर जाते तेव्हा लोक उत्सुकतेने तिच्या डोळ्यावर लावलेल्या गॉगल्सबद्दल विचारतात. त्यावेळी कॅरेन त्यांना बॅगलच्या आजाराची माहिती देते.