टोरंटो : 'ब्लॅकबेरी' या एकेकाळच्या आघाडीवर असणाऱ्या मोबाईल निर्माता कंपनीचे सध्या बुरे दिन सुरू आहेत असंच म्हणावं लागेल. ब्लॅकबेरी आपल्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना लवकरच डच्चू देणार असल्याचं समजतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओन्टॅरिओ आणि फ्लोरिडा स्थित आपल्या हेडकॉर्टर्समध्ये 'कॉस्ट कटिंग'च्या नावाखाली कर्मचाऱ्यांना नारळ दिला जातोय. 


एक वर्षापूर्वी म्हणजेच २८ फेब्रुवारी २०१५ रोजी ब्लॅकबेरीमध्ये ६२२५ कर्मचारी कार्यरत होते... पण, आता कंपनीत किती कर्मचारी आहेत, याबद्दल कोणतीही माहिती देण्यास कंपनीनं नकार दिलाय.  


गॅरी क्लासेनचाही समावेश


काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये गॅरी क्लासेन याचाही समावेश आहे. गॅरी हा बीबीएम मॅसेज सर्व्हिसचा जनक आणि या कंपनीत सर्वात जास्त काळ (१६ वर्ष) काम करणारा कर्मचारी आहे.