मुंबई : ब्लॅकबेरीनं त्यांच्या स्मार्टफोनमध्ये तब्बल 20 हजार रुपयांनी कपात केली आहे. 2014 मध्ये लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनची किंमत 49,990 एवढी होती. फ्लिपकार्टवर आता हाच फोन 29,990 रुपयांना मिळत आहे, तर अॅमेझॉनवर याची किंमत 33,950 रुपये एवढी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबरोबरच हा स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर 14,500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. यानंतर फोनची किंमत 15,490 एवढी होईल. 


काय आहेत या फोनची फिचर्स?


ब्लॅकबेरी पासपोर्ट फोनला 4.5 इंचाची एलसीडी टच स्क्रीन आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 


या फोनमध्ये 2.2 GHz क्वाडकोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 3 GB रॅम आहे. 


ब्लॅकबेरी पासपोर्ट कंपनीची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम ब्लॅकबेरी 10.3 ओएसवर चालणारा पहिला फोन आहे.