मुंबई : अनेकांनी आपली ड्रीम गर्ल कशी असावी याचा विचार केलेला असतो. त्यामुळे अनेक जण आपल्या ड्रीम गर्लच्या शोधात असतात. मुलींच्या बाबतीत ही असंच असतं. त्यांनी देखील आपला पार्टनर कसा असावा याचा विचार केलेला असतो. मुलींचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. पण बऱ्यास गोष्टींमध्ये साम्य असतं. त्यामुळे मुलांना कोणते ५ गुण असलेल्या मुली आकर्षित करतात हे तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५ गुण असणाऱ्या मुली मुलांना आवतात


स्मार्ट : मुलं केवळ मुलींच्या दिसण्यावर भाळतात हे सत्य नाही. त्याच्यासोबत वैचारिकरित्या मुली किती प्रगल्भ आणि हुशार आहेत या गोष्टीदेखील मुलांना इम्प्रेस करातात. सौंदर्यापेक्षा स्मार्ट मुलींकडे मुलं अधिक आकर्षित होतात.


काळजी घेणे : काळजी घेणाऱ्या मुलींना मुलं पसंत करतात. फक्त स्वतःचा विचार करणार्‍या मुलींपेक्षा इतरांचादेखील बरोबरीने विचार करणार्‍या मुली ‘गर्लफ्रेंड’साठी प्राधान्याने निवडल्या जातात.


विश्वास : जशा मुली त्यांच्या पार्टनरकडून विश्वासाची अपेक्षा ठेवतात तसंच मुलं देखील मुलींकडून ही अपेक्षा मुलींकड़ून ठेवतात. दोघांनाही नात्यामध्ये प्रामाणिकता आणि विश्वास निर्माण करण्याची गरज असते.


आदर : अहंकार कमी करून समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. तुमचं रिलेशन टिकून राहण्यासाठी समजूतदारपणा आणि एकमेकांच्या प्रती आदर असणं खूप आवश्यक आहे.


संयम : प्रत्येक नात्यामध्ये चढ उतार होतातच. केवळ चांगल्या वेळेत तुमच्या सोबत राहणार्‍या मुली आयुष्यभर टिकून राहू शकत नाहीत. कठीण काळात साथीदारासोबत राहण्यासाठी संयमदेखील गरजेचा असतो. अशा मुली लाईफ पार्टनर असाव्या असं मुलांना वाटतं.