`सीबीएसई` दहावीचा निकाल २७ मे रोजी
निकाल विद्यार्थ्यांना www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.
नवी दिल्ली : दहावीच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना खालील वेबसाईटवर पाहता येईल.
या वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता
www.cbse.nic.in
www.cbseresults.nic.in
सीबीएसई बोर्डाकडून १ मार्च ते २८ मार्च या काळात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला १३ लाख ७३ हजार ८५३ विद्यार्थी उपस्थित होते.
सीबीएसई बोर्डाने गेल्या शनिवारी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. या परीक्षेत दिल्लीची विद्यार्थीनी सुकृती गुप्ता ही देशात पहिली आली होती.