केवळ ५०१ रुपयांना मिळतोय ८००० रुपयांचा फोन!
भारतात बनविल्या जाणाऱ्या `चॅम्पवन सी1` नावाचा एक स्मार्टफोन लवकरच ग्राहकांसमोर येतोय. या फोनची खरी किंमत ८००० रुपयांची असली तरी १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या फ्लॅश सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ ५०१ रुपयांना ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
मुंबई : भारतात बनविल्या जाणाऱ्या 'चॅम्पवन सी1' नावाचा एक स्मार्टफोन लवकरच ग्राहकांसमोर येतोय. या फोनची खरी किंमत ८००० रुपयांची असली तरी १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या फ्लॅश सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ ५०१ रुपयांना ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
५०१ रुपयांत फोन मिळवण्यासाठी ग्राहकांना सुरुवातील ५१ रुपयांचा एक 'चॅम्पवन क्लीन मास्टर' नावाचं एक मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल. हे अॅप ३ नोव्हेंबरपासून उपलब्ध झालंय. यामध्ये विचारलेली माहिती भरून रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर confirm order वर क्लिक करावं लागले.
ही प्रोसेस पूर्ण करणाऱ्या ग्राहकांनाच हा फोन सेलमध्ये उपलब्ध होऊ शकेल. ५०१ रुपयांना ग्राहकांना मिळालेला फोन त्यांना केवळ कॅश ऑन डिलिव्हरीवर घरपोच मिळेल.
उल्लेखनीय म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीही 'चॅम्पवन इंडिया' कंपनीनं असाच फ्लॅश सेल जाहीर केला होता... त्यानंतर मात्र तो कधी झालाच नाही.