मुंबई : लग्न हे दोन जीवांचे पवित्र बंधन असते. अरेंज मॅरेजमध्ये होणारी बायको कशी असते याची जास्त कल्पना नसते. तुमचं लग्न ठरलं असेल तर तुमच्या होणाऱ्या बायकोबद्दल तुम्ही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आळशी आणि दुसऱ्यांवर अवलंबून असणे - संपूर्ण कुटुंबाल जी चांगली सांभाळेल अशी बायको प्रत्येक मुलाला हवी असते. मात्र लग्न होणार असेल तर या गोष्टीवर लक्ष द्या की होणारी बायको आळशी अथवा कोणत्याही कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून तर नाही ना. 


इमोशनल अत्याचार - तुमची होणाऱ्या बायको सतत लहान लहान गोष्टीवरुन तुमच्याशी भांडते का? ती कोणत्याही लहानसहान गोष्टीवरुन तुमच्यावर इमोशनल अत्याचार करते का? असे असेल तर तुमच्या नात्याबाबत पुन्हा एकदा जरुरु विचार करा. 


सगळ्यांशी कठोरपणे वागणे - जर तुमच्या गर्लफ्रेंडचे वागणे सगळ्यांशीच कठोरपणे असेल तर तुम्ही लग्न करण्याआधी जरुर पुन्हा एकदा विचार करावा. 


खोटं बोलणे - तुमची होणारी बायको तुमच्याशी खोटं बोलते का? असं असेल तर तुमच्या नात्यात खोटेपणा येऊ देऊ नका. तो वेळेआधीच दूर करा. अन्यथा तुमच्या नात्यावर याचा परिणाम होऊ शकतो. 


तुम्हाला बदलवण्याचा चंग बांधणे - लग्नानंतर मी तुला बदलवेन असं सतत तुमची होणारी बायको बोलत असते का? तुमच्यातील कोणती गोष्ट तिला आवडत नाही जे जाणून घेऊन ती तुम्हाला पटल्यास बदलण्याचा प्रयत्न करा. अन्यथा नाते तिथेच थांबवा.