मुंबई : नवी दिल्ली: जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेतला आहे. तो १०० टक्के चार्ज केला आहे तरी त्याची बॅटरी जर लवकर संपत असेल तर समजा तुम्ही काही तरी चूक करत आहात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मार्टफोनची चार्जिंग लवकर संपण्यामागचं सत्य


१. १०० टक्के बॅटरी चार्ज झाल्यानंतर ही जर तुम्ही चार्जिंगचं प्लग तसचं ठेवत असाल आणि चार्जिंग सुरुच असेल तर हे बॅटरी लवकर संपन्यामागचं कारण असू शकतं.


२. बॅटरी कधीही १०० टक्के चार्ज करु नका. जास्त विद्यूत प्रवाह बॅटरीमध्ये जात असेल तर त्यामुळे तुमची बॅटरी लवकर खराब होऊ शकते. शक्यतो चार्जिंग करतांना मोबाईल बंद करुन ठेवावा.


३. तुमचा स्मार्टफोन नेहमी थंड वातावरणात ठेवा. तुमच्या फोनच्या प्लगला उष्णतेपासून लांब ठेवा. जर तुम्ही भर उन्हातून जात असाल किंवा तुमचा फोन उष्ण वातावरणात असेल तर त्याला व्यवस्थित झाकून ठेवा. बॅटरीला उष्णात लागू देऊ नका.