मुंबई : काही महिन्यांपूर्वी फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला होता. २५१ रुपयात हा स्मार्टफोन आल्यानंतर आता ८८८ रुपयात नवा स्मार्टफोन बाजारात आला आहे. डोकॉस मल्टीमीडिया प्रायवेट लिमिटेड या कंपनीने Docoss X1 स्मार्टफोन लॉन्‍च केला आहे. ज्याची किंमत फक्त ८८८ रुपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्मार्टफोनची बुकिंग बुधवार, २७ एप्रिल ते २९ एप्रिल रात्री १० वाजेपर्यंत सुरु असणार आहे. या स्मार्टफोनची डिलीवरी २ मे पासून सुरु होणार आहे.


कसा कराल स्मार्टफोन बूक


या स्मार्टफोनची बुकिंग दोन प्रकारे केली जावू शकते. कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.docoss.com वर लॉगईन करुन किंवा एसएमएस करुन देखील तुम्ही फोन बुकिंग करु शकता. तुमचं नाव, पत्ता आणि पिन कोड तुम्हाला 9616003322 या नंबरवर एसएमएस करु शकता. फोन मिळाल्यानंतर म्हणजेच कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला ९९ रुपये डिलिव्हरी चार्ज अधिक द्यावे लागतील.


स्मार्टफोनची वैशिष्ट्ये


या स्मार्टफोनमध्ये ४ इंचाची आयपीएस स्क्रीन दिली गेली आहे. ड्युअल सिमची सुविधा देखील या मोबाईलमध्ये आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. डोकॉस एक्स १ मध्ये एक जीबी रॅम दिली गेली आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम हे सगळे अॅप यामध्ये काम करतात. या स्मार्टफोनमध्ये २ मेगापिक्सल कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. १३०० एमएएचची लिथियम बॅटरी, ४ जीबी इंटरनल मेमरी आणि ३२ जीबी एक्सपांडेबल मेमरी ही या फोनची वैशिष्ट्य आहे.