मेट्रोमध्ये नशेत टल्ली असलेल्या तरुणींचा व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली : एकीकडे महिला दिनाच्या निमित्ताने देशभरात महिला दिनविषयक कार्यक्रम सुरु असताना दिल्लीच्या मेट्रोमध्ये काही तरुणींना नशेत धुडगूस घातला. मेट्रो प्रवासादरम्यान या महिला एका पुरुष प्रवाशाशी भिडल्या. यावेळी त्यांनी शिवीगाळही केली. या पुरुष प्रवाशाने मात्र महिलांशी जास्त वाद न घालता तेथून पळून जाणे योग्य समजले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.