मुंबई : फेसबूकवर सध्या अनेक जण फ्रेंड्स डेचे व्हिडिओ शेअर करत आहेत. फेसबूकला आज म्हणजेच 4 फेब्रुवारीला 13 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे फ्रेंड्स डे सेलिब्रेट करण्यात येत आहे.


फ्रेंड्स डेच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे फोटो आणि शेअर केलेल्या आठवणी दिसतात. हे सगळे फोटो आणि आठवणी एकत्र करून डान्स करणारं चित्रही या व्हिडिओमध्ये तयार होतं.