न्यूयॉर्क:  आता व्हॉट्सअॅप मेसेंजरवर असलेली सर्व खाजगी माहिती फेसबुकला  दिली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 व्हॉट्सअॅप मेसेंजरवरील खाजगी माहिती फेसबुकला हस्तांतरित होणार असल्याच्या, निर्णयाने व्हॉट्सअॅप मेसेंजर वापरणाऱ्या प्रत्येक युजरमध्ये  आपली खाजगी माहिती लीक होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.


व्हॉट्सअॅप मेसेंजर वापरणाऱ्या युजर्सची सर्व माहिती पूर्णपणे खाजगी राहील असं कंपनीकडून नेहमी सांगण्यात येत होते. परंतु आता असे न होता युजर्सच्या खाजगी आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक हालचालींची नोंद फेसबुककडे असणार आहे.


फेसबुक  व्हॉट्सअॅपची पॅरेंट कंपनी आहे. व्हॉट्सअॅप मेसेंजरवरील खाजगी माहिती फेसबुकला हस्तांतरित करण्याचा, हा निर्णय कंपनीच्या आतापर्यंतच्या सर्व धोरणाशी विसंगत असल्याचं तज्ज्ञांनी म्हंटल आहे.


या धोरणामुळे व्हॉट्सअॅप युजर्सच्या मोबाईल नंबरसह त्याची सर्व खाजगी माहिती फेसबुक कंपनीला पाहायला मिळणार आहे.