मुंबई : मोराग हॅस्टिंग्स नावाच्या एका फोटोग्राफरनं सोशल मीडिया फेसबुकवरून शेअर केलेला एका फोटो 'फेसबुक'च्या व्यवस्थापनानं 'लैंगिक' आणि 'आक्षेपार्ह' ठरवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अपत्याच्या जन्माच्या वेळीचा हा फोटो आहे. या फोटोनं आत्तापर्यंत अनेक अॅवॉर्डही पटकावलेत. हा फोटो आत्तापर्यंतचा एक दुर्मिळ फोटो म्हणून गणला गेलाय. 


फोटो केला बॅन


परंतु, मार्क झुकरबर्गच्या 'फेसबुक'ला मात्र हा फोटो खटकलाय. हा फेसबुकच्या यूझर्ससाठी आक्षेपार्ह ठरू शकतो, असं फेसबुक व्यवस्थापनाला वाटलं. त्यामुळे 'फेसबुक'नं हा फोटोच बॅन करून टाकला. 


सौ. मोराग हॅस्टिंग्स

हॅस्टिंग यांचं अकाऊंट बंद


इतकंच नाही तर फेसबुकनं फोटोग्राफर हॅस्टिंग्स यांचं अकाऊंटही एका महिन्यासाठी बंद करून टाकलं. हा फोटो कंपनीच्या प्रोटोकॉल्सचं उल्लंघन करत असल्याचं स्पष्टीकरण फेसबुकनं दिलंय. 


हॅस्टिंग्स यांचं प्रत्यूत्तर


पण, हॅस्टिंग्स यांनाही फेसबुकनं जाहीर केलेल्या गाईडलाईन्स माहीत आहे... पण, आपण कोणत्याही प्रोटोकॉल्सचं उल्लंघन केलं नसल्याचा त्यांचा दावा आहे. 'या फोटोमध्ये महिलेच्या शरीराचा कोणताही लैंगिक अंग दिसत नाही... किंवा यात कोणत्याही लैंगिक कृतीचाही समावेश नाही' असं त्यांनी म्हटलंय. 


फेसबुक माफी मागणार?


आता फेसबुक आपली चूक मान्य करून या अॅवॉर्ड विनिंग फोटोवरचा बॅन हटवून माफी मागणार का? याकडे अनेक नेटिझन्सचं लक्ष लागलंय.