मुंबई : स्मार्टफोनवर 4G इंटरनेट वापरायला उत्सुक असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. रिलायन्स जिओनं 4G सर्व्हिस लॉन्च करायच्या आधी ग्राहकांना फ्री ट्रायल देणार आहे. या स्कीममध्ये ग्राहकांना 90 दिवसांसाठी अनलिमिटेड 4G इंटरनेट आणि 4500 मिनीटांचं व्हॉईस कॉलिंग फुकटात देण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या स्कीमचा फायदा घेण्यासाठी रिलायन्सनं काही अटी ठेवल्या आहेत. ही स्कीम वापरण्यासाठी ग्राहकाला Lyf चा स्मार्टफोन विकत घ्यावा लागणार आहे. 


हा फोन विकत घेतल्यानंतर ग्राहकाला www.jio.com वर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. हे रजिस्ट्रेशन केल्यावर ग्राहकाला कंपनीकडून इमेल मिळेल. या मेलमध्ये कंपनीच्या सुविधांबाबत सगळी माहिती असणार आहे. या मेलमध्ये असलेला बारकोड तुम्हाला Lyf स्टोर किंवा रिलायन्स डिजीटल स्टोर मध्ये जाऊन दाखवावं लागेल. यानंतर तुम्हाला रिलायन्स जीओ फ्री सीमकार्ड देईल. 


सीमकार्डची पडताळणी झाल्यानंतर मोबाईलमध्ये ही 4G सेवा सुरु होईल. रिलायन्स जीओ या वर्षाच्या शेवटी मार्केटमध्ये आपली सेवा सुरु करेल असा अंदाज आहे.