गुडन्यूज : जिओकडून `समर सरप्राइज` गिफ्ट, जूनपर्यंत सर्व मोफत
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी `समर सरप्राइज` गिफ्ट देऊ केले आहे. त्यानुसार जूनपर्यंत सर्व सेवा मोफत मिळणार आहेत.
मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 'समर सरप्राइज' गिफ्ट देऊ केले आहे. त्यानुसार जूनपर्यंत सर्व सेवा मोफत मिळणार आहेत.
जिओने आपल्या प्राइम सदस्यांना 'जिओ समर सरप्राइज'ही दिले आहे. त्यानुसार १५ एप्रिलपर्यंत ३०३ रुपये वा त्यापेक्षा जास्त रकमेचा प्लान घेणाऱ्यास पहिले तीन महिने सर्व सेवा मोफत मिळणार आहेत.
रिलायन्स जिओचे प्राइम सदस्यत्व ज्यांना मिळालेले नाही त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही कारण रिलायन्सने जिओ प्राइम सदस्यत्वासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे.
रिलायन्स जिओने देऊ केलेल्या मोफत 4 जी सेवेचा काल अंतिम दिवस होता. ही सेवा कायम ठेवायची असल्यास त्यासाठी ९९ रुपये भरून जिओ प्राइम सदस्यत्व घेणे आवश्यक असल्याचेही कंपनीने जाहीर केले होते.
जे ग्राहक ३१ मार्चपर्यंत प्राइम सदस्यत्व मिळू शकले नाहीत त्यांच्यासाठी आणखी एक संधी आहे. जे आधीच जिओचे ग्राहक आहेत ते ९९ रुपये वा जे ग्राहक नाहीत ते ३०३ रुपयांचा प्लान वा अन्य प्लान खरेदी करून प्राइम सदस्यत्व मिळवू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.