गुगलने अखेर तालिबानी अॅप हटवले
अखेर गुगलने तालिबानी अॅप आपल्या प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहे. इस्लाम कट्टरवाद्यांनी अॅप बनवले असल्याचं सांगण्यात येत आहे. हे अॅप पाश्तो भाषेत होते. त
काबूल : अखेर गुगलने तालिबानी अॅप आपल्या प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहे. इस्लाम कट्टरवाद्यांनी अॅप बनवले असल्याचं सांगण्यात येत आहे. हे अॅप पाश्तो भाषेत होते. त
अफगाणिस्तान चळवळीसंबंधी फोटो आणि व्हिडिओ यावर शेअर केले जात होते. हे अॅप 1 एप्रिलला लॉन्च करण्यात आले होते. मात्र लगेचच गुगुल प्ले स्टोअरमधून हे अॅप काढून टाकण्यात आले आहे. तांत्रिक समस्येमुळे हे अॅप बंद झाल्याचा दावा या ग्रपुने केला आहे.
'जागतिक स्तरावर प्रेक्षक तयार करण्यासाठी हे अॅप आमच्या प्रगत तंत्रज्ञानाचा हा भाग होता', असं तालिबानच्या प्रवक्त्याने ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं आहे.
'आमच्या युजर्स आणि डेव्हलपर्सना चांगला अनुभव मिळावा या हेतूने पॉलिसी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमच्या पॉलिसीचं उल्लंघन करणाऱ्याचे अॅप आम्ही काढून टाकतो', अशी माहिती गुगलने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.