मुंबई : आज वर्ल्ड फादर डे. दरवर्षी जूनच्या तिस-या आठवड्यातील रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांच्या प्रेमाचा आज दिवस. बाबा, पप्पा, डॅडी अश्या विविध लाडक्या नावाने आपण वडिलांना हाक मारतो.


कुटुंबाचा कर्ता म्हणून आपली भूमिका चोख बजावणारा आणि आपल्या सुख दुखात खंबीरपणे उभा राहणारा हा बाप माणुस. दमलेल्या बाबांना आज प्रेमाने अलिंगन देण्याचा दिवस..या फादर्स डे निमित्त गुगल डुडलनेही दखल घेत शुभेच्छा दिल्यात.