मुंबई : गुगलने विशेष डुडल बनवून राहुल देव बर्मन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंचम दा नावाने प्रसिद्ध असलेले महान संगीतकार, राहुल देव बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त आज गुगलने विशेष डुडल बनवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.


पंचम दा नावाची गोष्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर.डी. लहानपणापासून जेव्हा गुणगुणत असतं, तेव्हा ते शब्दाची सुरवात प अक्षरापासून करत असतं, अभिनेते अशोक कुमार यांनी त्यांची ही गोष्ट टीपली.


सारेगामापामध्ये प हे पाचव्या स्थानावर येत असल्याने, त्यांनी बर्मन यांना पंचम या नावाने हाक मारण्यास सुरवात केली. तेव्हापासून त्यांचे पंचम दा हे नाव प्रसिद्ध झाले. गुगल इंडियाच्या होम पेजवर बर्मन यांचे छायाचित्र दाखविण्यात आले आहे. या छायाचित्रात बर्मन गळ्यात मफलर घातलंय.