मुंबई : प्रेम आणि आसक्ती यांच्यातील हलक्याषा रेषेमुळे बऱ्याचदा खऱ्या प्रेमाची अपेक्षा फोल ठरते... पण, तुम्ही जर आपल्या नात्याकडे गंभीरतेनं पाहत असाल तर आपल्या जोडीदाराच्या हालचालींकडे जरासं लक्ष दिलंत तर ही हलकिशी सिमारेषाही खरं प्रेम ओळखण्यासाठी पुरेशी ठरते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही ज्या व्यक्तीसोबत प्रेमात आहात तेच तुमचं खरं प्रेम आहे का? हे ओळखण्यासाठी पुढील काही गोष्टींवर जरुर लक्ष द्या... 


त्याचं तुमच्या शब्दांकडे लक्ष असतं?


टाईमपास करणाऱ्या व्यक्ती बऱ्याचदा आपल्या जोडीदाराच्या बोलण्याकडे आणि शब्दांतून व्यक्त होण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, तुमच्यावर ज्याचं खरं प्रेम असेल तो तुमचा प्रत्येक शब्द लक्षपुर्वक ऐकेल. 


संवाद साधताना... 


आपल्या नात्याला फारसं महत्त्वं न देणाऱ्या व्यक्ती तुम्हाला मॅसेज तर करतील... पण, रटाळ पद्धतीनं... तुमचं क्रश तुम्हाला बोअरिंग जोक्स आणि माहिती शेअर करतील... पण, तुमच्यावर खरं प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात सुरु असलेल्या घडामोडींची छोट्यात छोटी माहिती देईलच... तीही बोअरिंग न करता... 


तुमच्या नजरेत नजर भिडवताना... 


तो जेव्हाही तुमच्याशी संवाद साधेल... शब्दांतून किंवा शब्दांशिवाय... तेव्हा तेव्हा तो तुमच्या डोळ्यांत डोळे घालून बोलणारा आहे का, हे एकदा नक्की तपासा... तो जर तुमच्याशी नजर भिडवताना घाबरत असेल तर तुमच्या नात्याचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला हवा.


भांडणं करा, पण... 


अनेक नाती तुटतात ती नात्यातल्या विसंवादामुळे आणि भांडणांमुळे... पण, तुमच्याशी तोच व्यक्ती प्रेमातही भांडू शकतो, ज्याला तुमची काळजी असेल. टाईमपास करणारी व्यक्ती तुमच्या चुकांवर पांघरून घालून कोणताही वाद न घालता पुढे निघून जाऊ शकतो. 


तो तुमच्या मित्र-मैत्रिणींना भेटतो?


तो कितीही अस्ताव्यस्त असेल किंवा कितीही बिझी असेल... तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींची तो नक्की भेट घेईल. पण, जो आपल्या नात्याची पर्वा करत नसेल तो मात्र तुमच्या मित्र-मैत्रिणींपासून लांब राहण्याची निमित्त शोधत राहील.