मुंबई : ले-इको ही कंपनी आज ८ एप्रिल रोजी 'ले इको' दिन साजरा करणार आहे. ग्राहकांसाठी खास गोष्ट अशी की, या दिवशी मोबाईलवर खास सूट मिळणार आहे. ले-इकोचे मोबाईल फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर आकर्षक दरात मिळणार आहेत. यात एक्सचेंजसोबतच कॅशबॅक ऑफर्सही मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करण्याच्या विचारात असाल तर नव्या Le 1s वर तुम्हाला आकर्षक सूटही मिळू शकेल. तब्बल ९० टक्क्यांपर्यंतची सूट तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तसंच क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून आणखी काही कॅशबॅरक ऑफरही मिळू शकते.


Le 1s या फोनवर मिळणारी सूट ही आत्तापर्यंत कोणत्याही फोनवर मिळणारी सर्वात मोठी सूट असल्याची चर्चा आहे. या फोनमध्ये मीडियाटेक X10 हा प्रोसेसर असून ३२ जीबी इंटरनल स्टोरेजही आहे. या फोनमधअये ३ जीबीचा रॅम आहे.


आजच्या गुढीपाडव्याला तुम्ही नवीन फोन खरेदी करू इच्छित असाल तर या फोनचा पर्याय तुम्ही निवडू शकता.